राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ आयोगाने असे स्पष्ट केले आहे की ३ ते ६ वयोगटापर्यंत पूर्व प्राथमिक शिक्षण प्रत्येक बालकाला दिले पाहिजे. परंतु आपल्या देशात अद्यापही पूर्व प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम निश्चित केला नाही . सध्याच्या घडीला सर्व मानसशास्त्रज्ञ मान्य करतात. की ३ ते ६ वयोगट हा मुलांचा प्रचंड ग्रहण क्षमता असणारा वयोगट आहे. मात्र या काळातील पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे शिक्षणाचा अधिकार (Right to Education) या बिलांनी लक्ष केंद्रित केलेले नाही. या सर्वाचा विचार करून आम्ही संस्थेच्या माध्यमातून जिजाऊ ज्ञानमंदिरा ची सुरुवात केली आहे बालमनावर योग्य असे संस्कार केले जातील यातून जगण्याचे भरणे सध्याच्या युगामध्ये माणूस माणूसपण हरवून बसलेला आहे सद्यस्थितीला बालकांच्या पालकांना आपल्या पाल्याकडे पूर्ण लक्ष देता येत नाही त्यामुळे बालपणात चांगले संस्कार होत नाही त्यासाठी दर्जेदार शिक्षण प्रयत्नवादी परिवर्तनवादीव वा्तववादी शिक्षण देणे गरजेचे आहे जिजाऊ ज्ञान मंदिरामध्ये विज्ञाननिष्ठ व संस्कार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून घ्यायचे आहे यातून इंग्रजी, मराठी माध्यम अशी व्यवस्था केली आहे. आम्हाला विश्वास आहे की पूर्व प्राथमिक शिक्षणाचा हा प्रयोग ग्रामीण व शहरी भागामध्ये सुरुवात करून राष्ट्रमाता जिजाऊ चे संस्कार ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांच्यावर झाले होते त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षण क्षेत्रात नवीन क्रांतिकारक पर्वाची सुरुवात झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.