Jijau Dnyan Mandir

पालकांसाठी सूचना...

१) पालकानी आपल्या पाल्याला नियमितपणे व वेळेवर शाळेत पाठवावे.

२)पाल्य आजारी असेल तर त्याला शाळेत पाठवू नये व तशी सूचना द्यावी.

३) पाल्य दीर्घकाळ अनुपस्थित राहणार असेल तर आगोदर तसा अर्ज करावा. अन्यथा दंड केला जाईल.

४) शाळेत सर्व सार्वजनिक सुट्या राहतील तशी सूचना फलकावर दिली जाईल.

५) पाल्यास शाळेत ने-आण करण्याची जबाबदारी पालकांवर राहील.

६) पाल्याच्या प्रगतीची चौकशी पालकांनी करणे आवश्यक आहे.

७) वर्ग चालू असताना शिक्षकेस व पाल्यास भेटणे टाळावे.

८) शाळेत वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमास हजर रहाणे आवश्यक आहे.

९) दात, डोळे, नाक याची नियमित स्वच्छता करने, दररोज अंघोळ करणे स्वच्छ कपडे घालणे, नखे काढणे अशा चांगल्या सवयी लावण्याचं प्रयत्न करावा

१०) पाल्याला स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लावावी, तसेच वयाला अनुरूप खेळ खेळण्याची संधी द्यावी.

११) रेडिओ /टीवी वापरावर नियंत्रण आणावे परंतु ज्ञान वाढवणारे कार्यक्रम ऐकण्यास /पहाण्यास उतेजन द्यावे.

१२) जेवण करताना सर्व पदार्थ खाण्याची सवय लावा.

१३) आपल्या पाल्यास लवकर झोपवावे व लवकर उठवावे.(लवकर झोपे ,लवकर उठे ,त्यास आरोग्य संपदा भेटे)

१४) पाल्यास मौल्यवान वस्तू (सोने) परिधान करू नये. हरवल्यास संस्था जबाबदार रहाणार नाही.